₹1.75 लाखांत Shockwave ची दमदार एंट्री​ | Ultraviolette Shockwave का खास?​

Ultraviolette Shockwave ही हलकी, रस्त्यावर चालवायला कायदेशीर इलेक्ट्रिक enduro  बाईक आहे जी शहरातील रोजचे खड्डे आणि weekend चा ढोंगरातील रफ सवारी साठी बनवली आहे. 14.5 bhp मोटर, 505 Nm व्हील-टॉर्क, 4 kWh बॅटरी, 120 Km/ता टॉप स्पीड आणि IDC प्रमाणे 165 Km रेंजचा कॅम्पनाय दावा करते.

का खास वाटते?

120 किलोंचा kerb वेट आणि लांब travel सस्पेन्शन, समोर 200 mm /180 mm मागे असल्याने ऑफ-रोडवर चपळ आणि आत्मविश्वास देणारा राईड भेटतो. 19/17 इंच wire-spoke wheels, ड्युअल-पर्पज टायर्स, स्विचेबल ड्युअल-चॅनेल ABS, 4 लेव्हल ट्रॅक्शन आणि 6 लेव्हल रिजन सेटअपमुळे कंट्रोल आणि कार्यक्षमतेचा उत्तम समतोल साधता येतो. 0 ते 60 किमी/ता फक्त 2.9 सेकंदांत गाठता येणार आहे जाचा मुळे शहरात झटपट ओव्हरटेक आणि मोकळ्या रस्त्यावर पुरेसा दमक बगायला भेटेल.

Shockwave चे TFT डिस्प्ले आणि स्विचेबल ड्युअल-चॅनेल ABS क्लोज-अप

कोणासाठी योग्यआहे हे गाडी?​

ईंधन देखभाल खर्च कमी हवा पण रोजचा प्रवास आणि आठोड्याचा शेवट चा ऑफ रोड दोन्ही हवेत असे रायडर्स.​
कंटेंट क्रिएटर्स किव्हा आउटडोअर किव्हा जान्ह निसर्गात गाडी चालवणं खूप आवडते ज्यांना हलकी, फोटोजेनिक आणि चपळ मशीन हवी असेल तर त्यांनी नक्की ह्या गाडीवर लक्ष ठेवावे.

फायदे​

1. हलका वजन आणि पटकन उचल घेणारी परफॉर्मन्स.​

2. इलेक्ट्रॉनिक्स ट्युनिंग आणि ट्रॅक्शन/रिजन सेटिंग्जने रेंज आणि ग्रिप निभावता येते.​

3. तुमी ही बाईक रस्त्यावर पण चालू शकता कारण ही रस्त्यावर चालवायला कायदेशीर आहे.

चेन-ड्राइव क्लोज-अप: Ultraviolette Shockwave ची गोल्डन O/X-रिंग चेन, स्टील स्विंगआर्म आणि रिअर स्प्रोकेटसह, स्वच्छ ल्यूब कोट आणि योग्य टेन्शन दाखवणारा तपशील

तोटे

1. रिअल वर्ल्ड रेंज साधारण 100 120 Km आहे त्या मुळे लांब ट्रेल्ससाठी चार्जिंग नियोजन गरजेचे.​

2. डिलिव्हरीज Q1 2026 पासून सुरु होणार त्यामुळे तत्काळ खरेदीदारांना प्रतीक्षा करावी लागेल.​

3. चेन ड्राईव्हला नियमित काळाने केअर लागतो.

मोटर 10.8 kW (14.5 bhp), 4 kWh बॅटरी, IDC 165 Km, टॉप speed 120 किमी/ता, 0 ते 60 Km/ता 2.9 सेकंद, kerb 120 किग्रॅ.​ फुडील / मागील डिस्क (270/220 mm) आणि  19/17 इंच व्हील्स व TFT डिस्प्ले. ह्या गाडीची किंमत ​ पहिल्या 1000 खरेदीदारसाठी ₹1.50 लाख व  नंतर ₹1.75 लाख (ex-showroom)

Ultraviolette Shockwave 19/17-इंच स्पोक व्हील्स आणि लांब-ट्रॅव्हल सस्पेन्शनसह उभी

एकाच बाईकमध्ये विकेंड Off road थ्रिल आणि शहरातील दररोजची सोय शक्य आहे आणि तीही पेट्रोल खर्चाशिवाय. 120 किलोंची हलकी इलेक्ट्रिक एंड्युरो, 0 ते 60 फक्त 2.9 सेकंदांत आणि किंमतही खिशाला परवडणारी अशी ही Shockwave नेमकी गेम चेंजर ठरेल का ?  हे नकीच पाहण्यास मज्जा येईल. डिलिव्हरी Q1 2026 पासून  सुरवात होऊ शकते.

Ultraviolette Shockwave ही फनडुरो कल्पना वास्तवात हणून कम्यूट, ट्रेल्स आणि कंटेंट-क्रिएशन तिन्ही गोष्टींसाठी एकाचवेळी योग्य असा हलका, दमदार आणि स्मार्ट पॅकेज दिसत आहे. ​रेंज नियोजनाचे भान ठेवले, तर 1.75 लाखांत मिळणारी ही गाडी नवख्या आणि अनुभवी दोघांसाठीही मूल्य पॅक ठरू शकते.

Leave a Comment