2026 मध्ये Kawasaki ने आपली लोकप्रिय मिड-वेट स्ट्रीटफायटर बाइक Z650 चा नवीन व्हर्जन Z650 S सादर केला आहे. या बाइकमध्ये रायडरचा आराम, एर्गोनॉमिक्स आणि इलेक्ट्रॉनिक फीचर्स सुधारले गेले आहेत. ‘S’ म्हणजेच स्टाइल आणि स्मार्टनेसचा मिलाफ, तरुण रायडर्ससाठी खास तयार केलेला हा नवा अपग्रेड म्हणता येईल.
Z650 S आता दिसायला अधिक डायनॅमिक आणि मस्क्युलर आहे. कंपनीने रायडर ट्रायंगलमध्ये बदल करून ही बाइक सर्व उंचीच्या रायडसाठी अधिक balanced बनवली आहे. फुटपॅगची जागा बदलली आहे ज्यामुळे गुडघ्यांना जास्त नैसर्गिक पोझिशन मिळते. नवीन handle bar मुळे रायडिंग पोझिशनही अधिक आरामशीर झाली आहे.

सीट डिझाईन पूर्णपणे Redesign करण्यात आले आहे. नवीन सीट आता अधिक रुंद आणि सॉफ्ट पॅडिंगसह येते, तर पिलियन पोर्शन 20mm जास्त रुंद आणि 10mm खोल आहे. Kawasaki ने दोन ऑप्शनल सीट्स, Style Seat (अधिक कम्फर्टसाठी) आणि Ergo-Fit Seat (20mm कमी हाइटसह) दिल्या आहेत.
या बाइकमध्ये तोच मजबूत 649cc पॅरेलल-ट्विन इंजिन आहे, ज्याचा मिडरेंज परफॉर्मन्स जबरदस्त आहे. 2026 मॉडेलचा मुख्य बदल म्हणजे आता या मध्ये KTRC ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम मिळणार आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर स्टेबिलिटी आणि सेफ्टी वाढते.
नवीन 4.3 इंच TFT कलर Display आता ब्लूटूथसह येतो, ज्यामुळे मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि Rideology App द्वारे नोटिफिकेशन्स तसेच रायड डिटेल्स पाहता येतात. स्पोर्टी रायडर्ससाठी बाय डायरेक्शनल Quick शिफ्टर हे ऐच्छिक ऍक्सेसरी म्हणून उपलब्ध असेल.
2026 Kawasaki Z650 S तीन रंगांत उपलब्ध असेल, Ebony/Metallic Carbon Grey, Candy Lime Green/Metallic Carbon Grey आणि Metallic Matte Graphene Steel Grey/Metallic Flat Spark Black.
आता पाहायचं फक्त इतकंच की यापैकी कोणते रंग भारतात येतात.