Hondaची ही नवीन येणारी इलेक्ट्रिक बाईक सध्या टीझर्स आणि टेस्ट स्पॉट्समुळे एकदम चर्चेत आहे. आणि 2 सप्टेंबरला जगभरात प्रक्षेपण होणार असल्याने अपेक्षांचा मोठा डोंगर उभा केला आहे. काही व्हिडिओ क्लिप्समध्ये DC फास्ट चार्जिंग, मोड-आधारित रेंज आणि युरोप-फर्स्ट लॉन्चचे संकेत दिसत असल्याने भारतासाठी टाइमलाइन थोडी पुढे जाण्याची शक्यता वाढते. पण प्रीमियम इ-परफॉर्मन्सवर लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते.

या टीझर्सवरून रेंज अंदाजे 110 ते 150 Km दरम्यान असू शकते आणि नॉर्मल/इको मोडनुसार ती बदलू शकते असे बोलले जाते आहे. जे शहरी राइडर्ससाठी पुरेसे पण इंडियन टूरिंग चालकांसाठी थोडेसे मर्यादित दिसत आहे. DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दाखवला गेल्यामुळे 1 ते 2.5 तासात टॉप अप शक्य होईल अशी अपेक्षा ठेवली जाते. जे दैनंदिन प्रवासात मोठा फरक घडवू शकते, डिझाईनच्या आऊटलाइनमध्ये EV Fun कॉन्सेप्टचे संकेत, स्पोर्टी स्टान्स आणि ग्लोबल इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून पोझिशनिंग आमाला दिसून येते.

टीझरमध्ये दिसणाऱ्या बाईकचं रूप पूर्णपणे उलगडलं नाही, ती जाड कॅमोफ्लाजमध्ये लपवलेली असल्याने फक्त LED DRL, TFT डिस्प्ले आणि स्पोर्टी स्टान्सचे झलक आमाला दाखवले आहेत.
अपेक्षा काय ठेवायच्या? पहिल्यांदा, होंडाच्या रिफाइनमेंट स्टँडर्डनुसार स्मूथ थ्रॉटल, प्रेडिक्टेबल रीजेन आणि सॉलिड बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम अपेक्षित आहे, दुसरे 50 hp क्लास परफॉर्मन्स, मल्टी-राइडिंग मोड्स, ABS, ट्रॅक्शन एड्स आणि कनेक्टेड फीचर्ससारखी पॅकेजिंग हाय-एंड सेगमेंटला टार्गेट करू शकते. तिसरे, जागतिक पातळीवर आधी लॉन्च आणि नंतर भारतीय बाजारात एंट्री म्हणजेच लोकल रेंज/प्राइस ऑप्टिमायझेशनला थोडा वेळ लागू शकतो आणि हो, Hondaने भारतात Activa E स्कूटर लाईन आधीच सुरू केल्याने सर्व्हिस नेटवर्क, EV पार्ट्स आणि सौम्य किंमत-धोरणाबाबत आत्मविश्वास थोडा वाढेल.

शेवटी, ही बाईक भारतीय EV मोटरसायकल मार्केटमध्ये प्रीमियम बेंचमार्क सेट करण्याची क्षमता ठेवते. परफॉर्मन्स-फर्स्ट दृष्टी, फास्ट चार्जिंग आणि होंडाची विश्वसनीयता एकत्र आली तर हे पॅकेज अल्ट्रावायोलेट/ओला सारख्या प्लेयर्सला थेट टक्कर देऊ शकते. बस, भारतीय रेंज-प्राइस ट्युनिंग आणि लॉन्च टाइमिंग हा खरा गेम चेंजर ठरणार असं वाढत.