महिंद्राकडून पुढील २ ते ३ वर्षांत अनेक नवीन SUV बाजारात येणार आहेत. पण आज आपण त्या गाड्यांविषयी बोलणार आहोत ज्या लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
जर येत्या काही महिन्यांत एखादा ब्रँड सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार असेल, तर तो म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा. SUV सेगमेंटमध्ये प्रसिद्ध असलेल्या या कंपनीकडे सध्या खूप व्यस्त लॉन्च कॅलेंडर आहे. त्यात अपडेटेड मॉडेल्सपासून ते एकदम नवीन इलेक्ट्रिक SUV पर्यंत सर्व काही आहे. २०२६ च्या शेवटपर्यंत महिंद्राचे पोर्टफोलिओ आणखी मजबूत होईल असं दिसतं.
देशभरात महिंद्राच्या टेस्ट म्युल्स रस्त्यावर दिसत आहेत. म्हणजेच इलेक्ट्रिक आणि पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मॉडेल्सवर जोरदार काम सुरू आहे. कंपनी आता एक नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आणण्याच्या तयारीत आहे जी XUV400 या खालील सेगमेंटमध्ये असेल. तिचं टार्गेट असेल, किफायतशीर आणि लांब रेंज असलेली EV हवी असणारे खरेदीदार.

ही नवीन SUV अंदाजे 450 KM रेंज देईल. ती XUV 3XO च्या डिझाईन आणि इंटीरियर लेआउटप्रमाणे दिसेल, पण तिच्यात काही खास EV फिचर्स दिले जातील जे तिला वेगळी ओळख देतील. ती दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
यानंतर बोलूया महिंद्राच्या “Vision S” SUV बद्दल. ही SUV आता प्रॉडक्शनच्या अगदी जवळ आली आहे. नुकत्याच पाहिलेल्या टेस्ट कारमध्ये अंतिम डिझाईनसारखाच लूक दिसला. मुंबईतील Freedom_NU शोकेसमध्ये या SUV ने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिचा रुबाबदार लूक आणि Scorpio N पासून प्रेरित डिझाईन सगळ्यांना अवडला हुता.
टेस्टिंगचा अंतिम टप्पा सुरू असल्यामुळे ही SUV पुढील वर्षभरात कधीही बाजारात येऊ शकते. मात्र महिंद्राकडून हे स्पष्ट करण्यात आल अहे की NU_IQ architecture वर बनलेल्या SUV 2027 पूर्वी येणार नाहीत. त्यामुळे Vision S ची नक्की लॉन्च डेट अजून ठरलेली नाही, पण ही कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO सारख्याच इंजिन सेटअपसह येण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, महिंद्राची लोकप्रिय SUV XUV700 तिच्या फेसलिफ्ट व्हर्जनसह 2026 च्या सुरुवातीला बाजारात येणार आहे. या अपडेटमध्ये मोठे बदल दिसतील. नुकत्याच नवीन झालेला थार, बोलेरो आणि बोलेरो निओ प्रमाणेच यात नवीन फीचर्स आणि आधुनिक लूक येईल.
तसंच, XUV.e8 नावाची तीन-रांगांची इलेक्ट्रिक SUV सुद्धा टेस्टिंगमध्ये दिसली आहे, जी XUV700 वर आधारित आहे. तिचं उत्पादन व्हर्जन 2026 पर्यंत येईल अशी शक्यता आहे.
महिंद्राकडून येणाऱ्या या सर्व SUV मुळे भारतीय बाजारात जबरदस्त स्पर्धा निर्माण होणार आहे.