टाटा मोटर्सने आपली नवीन Tata Sierra SUV लॉन्च केली असून तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे ११.४९ लाख रुपये ठेवली आहे. ही गाडी आपल्या सेगमेंटमध्ये जबरदस्त फिचर्स आणि डिझाइनसह आली आहे. जी क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा, ब्रेजा किंवा हॅरियर सारख्या इतर मॉडेल्सशी थेट स्पर्धा करायला सज्ज आहे. मॉडेलमध्ये स्लिम हेडलाइट्स आणि पूर्णपणे कनेक्टेड लाइटिंग सिस्टम यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये बगायला भेटतात.

ही Sierra १९ इंचाच्या टायरांसह येते ज्यामुळे रोडवरील ग्रिप आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. ग्राउंड क्लीयरन्स २०० ते २१० mm दरम्यान असल्याचे गृहित धरले जाते, ज्यामुळे अडथळ्यांवरून सहज चालता येते. फ्लश डोअर हँडल्स आणि युनिक मिरर स्टाइलिंग या गाडीत दाखवलेल्या सूक्ष्मतेचे उदाहरण आहेत. त्याचबरोबर, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शनसाठी आधुनिक अँगल डेड स्पॉट (ADS) फिचरही दिलेले आहे.
हे देखील वाचा : ४ जबरदस्त Mahindra SUV लाँचसाठी सज्ज | तयार रहा
बूटमध्ये ६२२ लिटरची स्पेस भेटते, जी या प्राइस सेगमेंटमध्ये तुलनेने खूप मोठी आहे. गाडीच्या कनेक्टेड टेललाइट्स आणि शार्क फिन एंटेना सारखी डिझाइन एलिमेंट्स दिसतात. सनरूफ मोठ्याप्रमाणावर असून, गाडीच्या आत अनेक प्रकारच्या कंफर्ट फिचर्स दिलेले आहेत.

इंटिरियरमध्ये तीन कनेक्टेड डिस्प्ले, HUD (हेड-अप डिस्प्ले), १२ JBL स्पीकर्ससह 5.1 साऊंड सिस्टिम आणि 5G कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा दिल्या आहेत. सीट्स बेज आणि व्हाइट कलर कॉम्बिनेशनमध्ये असून, तिन्ही माणसांसाठी पुरेपूर जागा दिलेली आहे. वायरलेस चार्जिंग, USB टाईप-C पोर्ट्स आणि प्रीमियम फिनिशसने युक्त असा इंटिरियर याचा अनुभव आणखी चांगला बनवतो.
इंजन पर्यायांमध्ये १.५ लिटरचे तीन इंजन्स आहेत. दोन पेट्रोल (साधा आणि टर्बो) आणि एक १.५ लिटर डिझेल, ज्यामध्ये सुधारित पावर आणि टॉर्क दिला आहे. हे डिझेल मॉडेल आता ६ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी हे गाडी एडव्हान्स लेव्हल २ ADAS फीचर्ससह येते.

टाटा Sierra चा ऑन-रोड प्राइस सुमारे ₹१३ लाखांपासून सुरु होतो आणि यातील समोरच्या व्हेरिएंटमध्येही सर्व प्रमुख फिचर्स उपलब्ध आहेत. ही SUV तरुण आणि फॅमिली दोघांसाठीही उत्तम आहे, ज्यात ड्रायव्हिंगचा आनंद आणि आराम यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो.
हे देखील वाचा : नवीन महिंद्रा बोलेरो आणि बोलेरो निओ | फीचर्स व किंमत
ही नवीन Tata Sierra मॉडर्न टेक्नॉलॉजी, प्रशस्तता आणि परफॉर्मन्स यांचे उत्तम मिश्रण असून, भारतीय SUV मार्केटमध्ये एक जबरदस्त पर्याय ठरू शकते.