पूरातही पोहोचणारा | ATOR N1200 ची खरी ताकद​

ATOR N1200 म्हणजे जमिनीवर, दलदलीत, बर्फावर आणि पाण्यातही समसमान ताकदीने धावणारा ऑफ रोडर. 55 hp Doosan D18 डिझेल, स्किड स्टिअर कंट्रोल आणि प्रचंड 71 इंच अल्ट्रा लो प्रेशर टायर्समुळे तो जिथे 4×4 थांबतात तिथे सुरू होतो. 40 किमी/ता, जमिनीवर आणि अंदाजे 6 किमी/ता पाण्यात गती असणारा, 1 मीटर अडथळे चढण्याची क्षमता, 24 ते 26 इंच ग्राउंड क्लीयरन्स आणि 8 ते 10 प्रवाशांसाठी सुरक्षित सीटिंग यामुळे हे युटिलिटी टेरिन व्हेईकल रेस्क्यू, आर्मी, ऑइल-गॅस, फॉरेस्ट्रीसाठी वरदान ठरत आहे.​​

ATOR N1200 पाण्यात तरंगत नदी ओलांडताना क्लोज अप दृश्य​

उद्या मुसळधार पाऊस, पुढे पुर, रस्ताच नाही तरीही टीम पोहचली तर, ती ATOR N1200 मुळेच पोचणार ह्यात काही शंका नाही. हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा, कारण पुढे तुम्हाला त्याच्या टायर्सपासून कंट्रोल्सपर्यंत सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी साध्या भाषेत समजतील आणि का ही गाडी स्विम करणारा ऑफ-रोडर म्हणून भारतात चर्चेत आहे ते कळेल.​​

71-इंच अल्ट्रा-लो-प्रेशर टायर्स आणि फ्लॅट-बॉटम चेसिसचा साइड प्रोफाइल​

या मशीनचा हृदय Doosan D18, 3-सिलिंडर टर्बो-डिझेलचा आहे. 55 hp, 190 Nm, कमी कंपन जा मुळे कमी आवाज, कडक हवामानातही भरोसा देणारी. 6-स्पीड मॅन्युअल आणि स्किड-स्टिअरिंगने स्टीयरिंग-व्हीलशिवाय टँकसारखी अचूक वळणे घेण्यास शक्षम आहे ही गाडी. सीलबंद चेसिस, ऑइल-बाथ चेन्स, ऑटो/हायड्रॉलिक असिस्ट, डिजिटल कंट्रोल्स आणि CTIS सारखी टायर-प्रेशर सिस्टीम ग्रिप, फ्लोटेशन आणि पाणी प्रोपल्शन एकत्र सक्षम करतात.​​

त्याचे 71×23-25 टायर्सच सस्पेंशनसारखे काम करतात जामुळे दलदली, वाळू, बर्फ, खडकाळ पृष्ठभाग आणि पाण्यात स्तीर्थने अगदी पुढे धावते. फ्लॅट बॉटम स्किड प्लेटचा मुळे मोठे दगड, पडझड आणि बर्फावर चढणे सोपे वाटत्ते. 320 लिटरपर्यंत संयुक्त इंधनक्षमता, 1.3 ते 2.2 गॅल/तास खप आणि 61 तास ऑपरेटिंग रेंजमुळे दुर्गम भागात सतत काम शक्य राहते. रिस्क्यू आणि सप्लाय साखळीसाठी खूप मदत्कार ठरले आहे.​​

स्किड-स्टिअर कंट्रोल्ससह केबिनचे डिजिटल इंटरफेस​

भारतामध्ये याचे ट्रायल्स आपत्ती निवारण दलांबरोबर झालेत. पूरस्थितीत नागरिक बचावात याचा प्रत्यक्ष वापर झाल्याने त्याची वास्तविक उपयुक्तता सिद्ध झाली असून स्वदेशी भागीदारीसह ATOR N1200 चे इंडिजिनायझेशन संरक्षण स्वावलंबनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Leave a Comment