Himalayan 750 आला नवीन दम आणी नव्या धमक्या सोबत

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ही पुढील मोठी Adventure बाईक म्हणून चर्चेत आहे, ज्यात सुमारे 750cc इंजिन आणि नवीन डिझाइनची अपेक्षा आहे. जगभरात अनावरण 2025 अखेरीस होण्याची शक्यता व भरता मध्ये लॉन्च 2026 च्या सुरुवातीस अपेक्षित आहे. किंमत प्रीमियम सेगमेंटमध्ये येईल आणि योग्य पोजिशनिंग झाल्यास ती मिड-वेट Adventure बाजारात मजबूत पाय रोवू शकते.​

Close-up of USD forks, dual discs and alloy wheel on Himalayan 750

उंच विंडस्क्रीन, हाफ फेअरिंग, मोठा फ्युएल टँक तसेच क्लासिक गोल हेडलॅम्प बगायला भेटते. 19 इंच पुढील आणि 17 इंच मागील चाके, स्पोक किंवा अलॉय या दोन्ही पर्यायांची चिन्हे दिसली आहेत. ड्युअल स्पोर्ट टायर्स आणि छान टेल-लॅम्प्समुळे बाईकला भारी आणि प्रीमियम look मिळतो.

समोर USD (upside-down) forks आणि मागे मोनोशॉक अशा सेटअपमुळे रस्त्यावरची स्थिरता आणि खडतर रस्त्यांवरील आराम दोन्ही सुधारतील. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स व काही व्हेरिएंट्समध्ये ड्युअल फ्रंट डिस्कची शक्यता वाटते आणि एकूणच सुधारित ब्रेकिंग हार्डवेअर दिसते. मोठ्या टँक क्षमतेमुळे लांब राईड्स सहज होतील.​

नवीन एअर-ऑइल कूल्ड पॅरलल-ट्विन 750cc युनिट हे 650 प्लॅटफॉर्मचे विकसित रूप मानले जाते. सुमारे 50 ते  55hp आणि 60Nm च्या आसपास आउटपुटची चर्चा आहे. सहा-स्पीड ट्रान्समिशनची अपेक्षा असून क्रूझिंग आणि लो-एंड टॉर्क दोन्ही सुधारतील हाच टूरिंगसाठी मोठा फायदा ठरेल.​

Side profile showing split seat, half fairing and upswept exhaust of Himalayan 750

फुल-डिजिटल टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि सिलेक्टेबल राईड मोड्स अशी वैशिष्ट्ये दिसू शकतात. स्पोक/अलॉय पर्यायांमुळे ऑन-रोड आणि ऑफ-रोड वापरात लवचिकता मिळेल.​

जगभरात उद्घाटन 2025 च्या अखेरीस तर भारतात विक्री 2026 मध्ये अपेक्षित आहे. प्रीमियम किंमत असूनही योग्य फीचर्स-परफॉर्मन्स संतुलन ठेवल्यास बाईक हिट होऊ शक्यता वडते.

Leave a Comment