तुम्ही कुटुंबासाठी सुरक्षित, स्थिर आणि मोकळ्या जागेचा इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर Komaki चा FAM 1.0 आणि FAM 2.0 हा अगदी योग्य पर्याय वाटतो. किंमत ₹99,999 आणि ₹1.27 लाख (ex showroom) असून हा तीन चाकी EVs स्कूटरची सोय आणि SUV सरखी स्थिरता एकत्र भेटते.
FAM म्हणजे SUV स्कूटर अगदी काय?
तीन चाकांचा लेआउट तुमच्यासाठी जास्त बॅलन्स आणि आत्मविश्वास देतो. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक किंवा वजनदार सामानासाठी हा उत्तम पर्याय आहे. Komaki ने याला “फॅमिली ट्रॅव्हलची नवी व्याख्या” म्हणत, सुरक्षित आणि कार्यक्षमतेचा समतोल साधण्यावर भर दिला आहे.

रेंज आणि बॅटरी
FAM 1.0 एका चार्जवर 100+ Km देते तसीच FAM 2.0 200+ Km पर्यंत जाते, जा मुले तुमाला दिवसभराच्या कामांसाठी पुरेशी रेंज मिळते. दोन्हीमध्ये LiFePO4 प्रकारच्या बॅटरी वापरल्या जातो त्या मुळे स्थिरता आणि आयुष्य साधारण ई-स्कूटरपेक्षा जास्त मानली जाते.
SUV लेव्हल जागा आणि फीचर्स
80 लिटर बूट आणि फ्रंट बास्केटमुळे किराणा, शाळेची बॅग किंवा छोट्या बिझनेसचे साहित्य आरामात मावते. मजबूत मेटॅलिक बॉडी, LED DRLs/इंडिकेटर्स, रिव्हर्स असिस्ट, ऑटो-हिल होल्ड आणि स्मार्ट डिजिटल डॅशबोर्डमुळे वापर रोजच्या गरजांसाठी अधिक सुलभ होतो.

सेफ्टी आणि स्थिरता
टॉर्क लीव्हर, हँड ब्रेक आणि फूट ब्रेकसह त्रिचाकी वळणांवर व खडबडीत रस्त्यांवर जास्त ग्रिप देतो. घरगुती वापर असो किंवा छोट्या डिलिव्हरी/लॉजिस्टिक्ससाठी व्यावसायिक वापर, हा स्कूटर दोन्हीसाठी खात्रीशीर आहे.
किंमत आणि व्हॅल्यू
FAM 1.0 ही ₹1 लाखाच्या आत चांगली व्हॅल्यू देते तर FAM 2.0 जास्त रेंज आणि फीचर्ससह लांब पल्ल्याच्या किंवा कमर्शियल वापरासाठी योग्य आहे. ब्रँडच्या मते FAM मालिका सामान्य भारतीय ग्राहकाच्या आवाक्यात ठेवण्यावर भर देते.
निष्कर्ष
एकंदरीत, Komaki FAM ने SUV Scooter अशी नवी श्रेणी तयार केली आहे. स्थिरता, जागा, रेंज आणि सुरक्षा यांचा बॅलन्स देत पारंपरिक स्कूटर आणि छोट्या कारला एक ताजं पर्याय दिला आहे. तुम्ही कुटुंबासाठी सुरक्षितता शोधत असाल किंवा बिझनेससाठी किफायतशीर डिलिव्हरी व्हेईकल—FAM 1.0/2.0 नकी पाहा.